पूर्वी पुण्यातील "कमला नेहरू पार्क" मधली भेळ खायचो तेव्हा आमचा तिथे एक भेळवाला ठरलेला होता. तो असे कागदी चमचे देत असे भेळ खाताना. कागदी चमच्यातही त्यातल्या त्यात चांगला चमचा आम्ही निवडून घेत होतो. कमला नेहरू पार्क मध्ये गेले की आधी भरपूर खेळायचे (लहानपणी) नंतर ओली भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटीस असे भरपूर खायचे. नंतर या पार्कमध्ये पिण्याचे पाणी होते ते प्यायचे व चालत घरी. असा आमचा कार्यक्रम ठरलेला असायचा. खूप वर्ष झाली या पार्कमध्ये गेले नाही. पुण्याच्या सर्व पार्कमध्ये ही पार्क मला विशेष आवडते. काही ठिकाणी भेळवाले चमचा म्हणून पाणीपुरीची खूप कडक असलेली पुरी देतात. बहुतेक मुंबईमध्ये.