तुमचं नाव बघून काहीतरी वेगळं आणि नवीन वाचायला मिळणार याची खात्री होतीच. मी कित्येक दिवस शोधत असलेलं , सोपं प्रोग्रॅमिंग तुम्ही किती सहजरीत्या सांगितलंय की "व्वा!! " ला थांबवणे शक्यच नव्हते.
मी स्वतः भौतिकशास्त्राचा शिक्षक आणि सध्या विद्यार्थी आहे. मला कित्येकदा संकल्पना समजावून सांगताना "अरे याचं मॉडेल असतं तर ...? " असं वाटायचं. दुर्दैवाने त्यावेळी मला लोगो आणि ऍलिस ची कल्पना नव्हती. असो. अर्थात मी काही म्हातारा झालो नाहीय अजून
लोगो आणि ऍलिसचा विकिपीडियाचा दुवा वर दिलेला आहे. अधिक दुवे देता आले तर अधिक उत्तम ...
खूप चांगल्या उपक्रमाबद्दल स्पार्कचे आणि या लेखाबद्दल तुमचे अभिनंदन व आभार.