असहमत...!!
मुक्तछंदात लिहलेलेसुद्धा काव्यच असते, पण काही म्हणा आमच्या दुर्दैवाने आम्हांस येथे छंद नियम पाळून जे काही(?) काव्य या नावाखाली वाचावयास मिळते त्यास कविता म्हणावे का? हा गहन प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे.खरं सांगायचे तर वृत्त, मात्रा हे सगळे मनातील स्फुरणाऱ्या काव्यानंतर येते. म्हणजे एखादे काही सुचल्यास तुम्ही त्यास वृत्तबद्ध करू पाहता, (म्हणजे हे ज्याला जमले तर फक्त तोच कवी व तिच कविता) हे गृहीत धरावे काय?
तर कधी अनाकलनीय, अगम्य २-४ (२००-४००? ) ओळी वृत्तात खरडल्या असता त्यास काव्य म्हणावे काय?
आमच्या प्रदिर्घ अनुभवानुसार आमचे मत= छंदमुक्त काव्य आणि छंदयुक्त काव्य काहीही असो, त्या काव्यात जर वाचकाच्या, रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारे काहीही नसल्यास ते काव्य असूच शकत नाही. काव्य हे सामान्य कुवतीच्या माणसास ही समजले पाहीजे. बाकी काव्य ही संकल्पना "व्याख्या" या संकुचित चौकटीत बसणारी किंवा बसवली जाणारी गोष्ट नव्हे.
'मुक्तछंद (? )' कितीही फुगवता, आटवता येतो. मान्य १००% (मग आपल्या छंदयुक्त काव्यातही आपण फुगवण्याचे काम केले आहेच ना? शरीर शरीर १ मध्ये)
(विषयांतर वाटलेला भाग वगळला : प्रशासक)