परंतू असा घाऊकपणे कुठल्याही जातीचा द्वेष करून काहीही फायदा होत नाही. ब्राह्मणांना सत्तेतून हाकलून दिले तर ते शिक्षणात अनेक योजने पुढे गेले! म्हणजे त्यांचा फायदाच झाला. संस्कृती ही कोणाचीही मक्तेदारी नाही. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतोच असे नाही. त्याउलट कमी शिकलेला असंस्कृत असतोच असे नाही. माणसाचा आत्मा हा जन्मतःच काही गुण व दोष घेऊन येत असावा. सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे ते गुणदोष कमी अथवा जास्त होत असावेत.त्यांत जातीचा काहीही संबंध नाही.
दुसरे असे की सत्य कधीही दडपता येत नाही. जे इतिहास घडवू शकत नाहीत तेच मग नैराश्याने जुना इतिहास बदलू पहातात.