सोडुनी गेलीस एका भ्याड दिवशी
ठेवुनी येथेच सारी अत्तरे ही?

भेटल्यानंतर तुला, होते मला जे
फुरसतीने सांग त्याची उत्तरेही

मी म्हणे जाणार आहे, ऐकतो मी
वाटते सारे खरे आणी बरे ही

जेवढे उड्डाण घ्यावे माणसाने
तेवढी उडतात वरती अंबरे ही                  ... व्वा, एकूणच छान !