मुळात प्रेक्षकाला काय पाहावेसे वाटते हे त्यांना कळवून घ्यावेसेच वाटत नाही. आपण जे देतो तेच सर्वोत्तम आहे तेव्हा ते प्रेक्षकांनी पाहावेच हा प्रकार चालू आहे तोवर..... आत्ता सुरू असलेल्या सारेगमाचे काही भाग यु-ट्युब वर पाहिल्यावर इतके कंटाळवाणे झाले की मी आताशा पाहतच नाही. पुन्हा रिझल्ट नावाचा प्रकार तर अतिशय अगम्य आहे. तेव्हा ही अशी विकतची दुखणी घेऊन वेळ बरबाद करणे म्हणजे......
संगीत ही काहीच कुटुंबाची मक्तेदारी नाही. फार चांगला मुद्दा आहे हा. दुर्देवाने ह्या अशा मक्तेदारीला स्वतः कलाकारांनी आणि त्यांना घाबरून इतरांनी खतपाणी घातल्याने अनेक गुणी कलाकार भरडले गेलेत.
लेख आवडला, अनेक गोष्टी मनात येऊन गेल्या.