मला तुमचा लेख छान वाटतो आहे. सोबत दुवे दिल्याने आता टिचकी मारून पान उघडणे सोपे झाले, त्याबद्दल धन्यवाद. जी मंडळी बऱ्याच कालापासून महाजालावर आहे, त्यांना हे कंटाळवाणे वगैरे होत असेल, पण माझ्यासारखी काही मंडळी असतील, ज्यांना याचा लाभ घेता येतोय.

वेगवेगळ्या विद्यापीठांनी संकेतस्थळे सुरू केली, मात्र निकाल जाहीर करणे, जाहिराती या पलीकडे काहीही कळत नाही. तसंच कोणालाही विपत्र पाठवले तरी (भारतीय विद्यापीठांतून किंवा सरकारी खात्यातून)  उत्तर मिळत नाही . यासाठी तक्रार करता येते का ? असल्यास कळवावे/ लिहावे.

लेख चांगला होत आहे... चालू द्या. अभिनंदन.