इतिहास हयात असलेल्या व्यक्तींचाही असू शकतो. त्याचा त्यांनाच उपयोग होऊ शकतो.

केवळ घडलेल्या घटनांचे, आपापल्या समजूतीप्रमाणे सत्य, आलेख तयार करणे हा इतिहासांकनाचाच भाग आहे.

भूतकाळातील व्यक्तींचे गुण दोष यांचीही इतिहासात छाननी करावी असे आपण म्हणता.
इतिहास अशा प्रकारेही लिहीता येऊ शकेल. मात्र माझा तसे करण्याचा विचार नाही.

माझे लेखन खूपच अपरिपक्व (प्रिमॅच्युअर) आहे असे तुम्हाला वाटत आहे.
प्रत्येकास एखाद्या विशिष्ट लेखनाबाबत स्वतःची मते असू शकतात.
आपण ती व्यक्त केलीत. मी त्या मतांचा आदर करतो.

मात्र आपल्या एकूण प्रतिसादावरून, आपल्याला 'महाजालावरील मराठीचा इतिहास' याबद्दलच्या लेखनाबाबत काही खास अपेक्षा असाव्यात असे जाणवते. माझ्या लेखनात त्यांची पूर्तता होत नसल्याचाही सूर जाणवतो.

आपल्याला काय हवे आहे? हे जाणून घ्यायला मला आवडेल.
मी ते देऊ शकेन किंवा नाही याची मला कल्पना नाही.
मी जे देऊ शकेन असे मला वाटते आहे तेच मी देत आहे.
त्याची वैधता, तपशील, परिपूर्णता यांबाबत स्वतंत्र मते राखण्याचा प्रत्येक वाचकाचा हक्कही अबाधितच आहे.