यांच्याकडे प्रतिभावंत लोकांची कमी आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे हे माहिती नाही... मुळात प्रेक्षकाची काय गरज आहे हे कुणालाही कळत नाही..
अगदी बरोबर.  टीव्ही बघणं खरंतर अगदी सटीसामासीच होतं, पण तरीही तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे.   टीव्हीवरचे कार्यक्रम (मराठी आणि अमराठी दोन्ही) बहुतेक वेळेस कंटाळवाणेच असतात.   प्रेक्षकांची गरज काय आहे, कार्यक्रम रंगतदार कसा करावा, एखादा कार्यक्रम किती दिवस चालू ठेवावा, कार्यक्रमांमध्य नाविन्य, वैविध्य कसं आणावं याबाबत हे लोक नीट सखोल विचार, अभ्यास करतात की नाही कोण जाणे. 

एक छोटसं उदाहरण म्हणजे शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय संगीतावर आधारित एकही कार्यक्रम माझ्या तरी माहितीत टीव्हीवर नाही.  माझ्या मते एक कार्यक्रमच काय एक संपूर्ण स्वतंत्र चॅनेल चालू शकेल एवढा मोठा तो विषय आहे. 

अवांतर : मला खरंतर अजूनही टीव्हीपेक्षा रेडिओच जास्त आवडतो.   आमच्या लहानपणी आमच्यासकट आमच्या सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे, नातेवाईकांकडे अगदी पहाटेपासूनच रेडिओ वाजत असायचा.   ती त्यावेळी सकाळी लागणारी माणिक वर्मा,  सुमन कल्याणपूर किंवा तत्सम गायकांची भक्ती गीतं आज ऐकली की अजूनही लहानपणच्या आठवणी जाग्या होतात! अशा आठवणी जाग्या करू शकणारा टीव्हीवरचा एकही कार्यक्रम स्मरत नाही.