ईसकाळ दि ८ जून २००९ येथे हे वाचायला मिळाले :
...
याबाबत माधव चव्हाण एका लेखात म्हणतात, "मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकता या शहरांतील उत्तम आणि उच्चभ्रू शाळांतील मुलांना गणित, विज्ञान आदी विषयांतील संकल्पनांची समज फारच कमी असते, असे निरीक्षण "एज्युकेशन इनिशिएटिव्हज'ने आपल्या पाहणीद्वारे नोंदविले आहे. इंग्रजी शाळांतही घोकंपट्टीच जास्त असते. अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना आशेने घालण्याचे प्रमाण गरीब वस्त्यांतही वाढत आहे. या मुलांना ना धड इंग्रजी येत ना धड मातृभाषा, अशी बऱ्याच अंशी स्थिती आहे. '' इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुले एक गल्लत भाषा बोलतात, असेही निरीक्षण आहे. त्यांच्या बोलण्यात इंग्रजी, हिंदी, मराठी अशा सर्व भाषांतील शब्द एकत्र येतात. यात कोणत्याही एका भाषेचे व्याकरण स्थिर राहत नाही. मुलांनी वास्तविक मराठीत बोलताना अस्खलित मराठीत आणि इंग्रजीत बोलताना अस्खलित इंग्रजीत बोलण्याची क्षमता प्राप्त करायला हवी. जागतिकीकरणाच्या या काळात मुलांना गल्लत भाषा उपयोगी नाही, तर अनेक भाषा (निदान इंग्रजी आणि स्वभाषा अशा दोन भाषा) स्वतंत्रपणे हाताळता आल्या पाहिजेत.
...
संपूर्ण लेख येथे वाचा : इंग्रजी शाळांत मराठी हवीच
(हा प्रतिसाद जालावरच्या कुसुमीमध्ये न देता मुद्दाम या लेखाखाली देत आहे. )
-मेन