बाबासाहेब पुरंदऱ्यांना शिवशाहीर म्हणतात, इतिहासकार नाही. त्यांनी शिवाजीच्या संदर्भात असलेले बरीचसे ऐतिहासिक दस्त‌ऐवज वाचले आहेत, आणि जिथेजिथे शिवाजीमहाराज जाऊन आले, तिथेतिथे ते स्वतः गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्राला वास्तविकतेचे एक प्रमाण लाभले आहे.  शिवाजीच्या त्या स्मारक समितीवर जे अन्यजण आहेत(उदाहरणार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री) त्यांचा शिवाजीशी काही संबंध आला आहे का?  वास्तविक या समितीवर फक्त वास्तुकलातज्ज्ञ, बांधकाम व्यवसायिक, मूर्तिकला आणि खोदकाम/कोरीवकाम/तैलचित्रे करणारे आणि स्थापत्य/सागरी अभियांत्रिक यांचाच समावेश करायला हवा.