नवीन दिलदार ओळ सुचता तुझ्या सुगंधात नाहतो मी
अजूनही चालते म्हणा तर तुझ्यावरी ही जुनीच युक्ती!

वा. चांगली गझल. क्ती चे यमक अवघड असून चांगले जमून आले आहे. (तक्ती असेही एक यमक मला सुचले! )

तुमची सोप्या शब्दांची आणि निर्दोष वृत्त जमवण्याची कला मात्र लाजवाब आहे

असाच  काढा सदैव चढता सुरेख आलेख या कलेचा
(नवीन परिशिष्ट एक जोडू जरी न जागा उरेल तक्ती! )

(मला वरील दोन ओळी जमवायला साडेतीन तासांहून अधिक वेळ लागला   )