मुळात प्रेक्षकाची काय गरज आहे हे कुणालाही कळत नाही..
चॅनेलवाले जर खरच एव्हढ्या रटाळ सिरियल्स दाखवत असतील तर त्यांचा टिआरपी रसातळाला जाऊन त्यांचे स्पॉन्सरर्स जाऊन ते कार्यक्रमच नाही का बंद होणार? ज्या अर्थी तेच तेच कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू आहेत त्या अर्थी त्यांचा टिआरपी चांगला किंवा ठिकठाक तरी असेलच ना. आणि त्याचाच अर्थ त्यांना प्रेक्षकवर्ग सुद्धा असणारच.
आता चूक कोणाची? टिव्हिवाल्यांची की कंटाळा येऊन सुद्धा टिव्हिसमोरून न हलण्याऱ्या प्रेक्षकांची?
वरील तर्कात काही चूक असेल तर जाणकारांनी सांगावे.