अनभिज्ञ वाचकांना, महाजालावर मराठी कशीकशी अभिव्यक्त होत गेली याचा, कालबद्ध नसला तरीही प्रमुख टप्प्यांवरील इतिहास, काहीशा सुसंगतपणे माहीत व्हावा हा हेतू धरूनच हे लेख लिहीत आहे. मात्र ते केवळ माझ्या माहितीवर आधारित असल्याने बखरनुमा आहेत. औपचारिकरीत्या इतिहास ग्रथन करतील अशी अपेक्षा त्यातून पूर्ण होण्यासारखी नाही. कारण ते औपचारिक अभ्यास करून लिहीलेले नाहीत. तर, स्मृतीच्या कोषातून केवळ बाहेर काढलेले आहेत, जिज्ञासू वाचकांना उपयोगी ठरावेत म्हणून.
आपल्याला ते उपयोगी वाटत आहेत हे महत्त्वाचे आहे. आनंदाचे आहे.
भविष्यातील वाचकांनाही हे बोधप्रद ठरतील असा विश्वास वाटतो.