श्री. वृकोदर,
ज्या लोकांनी स्वतः अस्पृश्यता पाळली, त्यानी फ़क्त ब्राम्हणांना झोडपण्याचं समर्थन मी करत नाहीये व ते अयोग्यच आहे. पण, ज्यांच्यावर खरचं अन्याय झाला, ते जर काही कारणास्तव आपल्याला झोडपत असतील, तर अशावेळी इतरांकडे बोटे न दाखवता, फ़क्त आपण आणि ते इथपर्यंतच चर्चा मर्यादित असावी त्यात इतरांना आणू नये, असे माझे मत आहे, आणि तेच मी वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
पुराणांबद्दल मला फ़रसं काही माहीत नाहिये. पुराणात कर्म-काडांविषयीची माहिती आहे आणि तत्कलीन समाजात त्याला फ़ार महत्वही होते. वेद त्यामानाने बरेच वेगळे आहेत. वेद शब्दाचा अर्थच to know असा आहे. वेदांमधली माहिती, काव्य स्वरुपात व गुढ रुपात मांडली गेली आहे. व्यवहारात लागणारी यंत्रे, साधने ह्याबद्दल वेदांमध्ये काहीही माहिती नसेल. पण म्हणून वेद निरर्थक कसे ठरतात ? ह्याउलट, आर्युवेद ( अग्नीवेश संहिता) , ज्योतिषशास्त्र ( ऋगवेद), खगोलशास्त्र (ऋगवेद), प्राचिन भारतीय संगीत (सामवेद) , गणित ( वेदिक सुत्रे ) व अश्या बऱ्याच गोष्टी वेदांवर आधारीतच होत्या. हे सर्व निरर्थक आहे का ? आपल्याकडील ह्या ज्ञानाचा प्रसार आणि वाढ नीट झाली का ? आणि जर नाही तर का नाही ? ह्या ज्ञानदानाच्या कार्यात कसुर झाली का ? आज जेव्हा वेद निरर्थक होते असे म्हटले जाते, त्यावरुनच त्या ज्ञानाच ऱ्हास झाला आहे हेच स्पष्ट होते. प्रश्न उरतो तो हा की, हे का झालं आणि कोणी केलं ?
चातुर्वणाप्रमाणे ब्राम्हणांच स्थान सर्वात बरचे, आणि त्याला एक कारण म्हणजे , त्यांना ह्याबद्दल ( वेद इ.) असलेल ज्ञान. त्यामुळे ह्या ज्ञानाच्या ऱ्हासाला जवाबदार पण तेच नाहीत का ? वर्ण आधारीत समाजात ज्यांचे स्थान वरचे त्यांची जवाबदारीही जास्त नाही का ? संघ जिकला की ज्याप्रमाणे कप्तानाला इनाम, त्याप्तमाणे हरलाकी झोडपलेही त्यालाच जाते. ब्राम्हणांनाही ह्याच न्यायाने झोडपलं जात असेल का ?
माझ्या लेखात कर्वे, आगरकर, चिपळुणकर इ. प्रभुतिंच्या कार्याबद्दल मी कुठेच शंका घेतली नाहीये. चांगल ते चांगलच.. आणि चुक ते चुकच. ज्याप्रमाणे एखाद्या विषयाबद्दल आपले एखादे मत असु शकते, त्याच प्रमाणे माझेही मत असु शकते आणि तेच मत मांडण्याचा मी प्रयत्न करतोय.
मयुरेश वैद्य.