आम्ही एकदा आमच्या जर्मन नाटकाच्या प्रयोगासाठी डेक्कन क्वीनने मुंबईला निघालो होतो. आमच्या ६ जणांपैकी एकाची सीट दुसऱ्या बाजूला गेली होती. आम्ही ५ जण आणि एक दुसरीच मुलगी एका कंपार्टमेंट मध्ये होतो. आम्ही एकमेकांत बोलतच होतो की तिला "तिकडे बसायला सांगुया" आणि तिला कळू नये म्हणून जर्मन मध्ये बोलत होतो. तिला का कळू द्यायचं नव्हतं कोण जाणे? बहुतेक आमचं ठरल्यावरच विचारावं असं वाटलं असावं.
हे सगळं आमचं चाललं असताना अचानक तीच आम्हाला म्हणाली, "ह्या सगळ्याची चर्चा करत बसण्यापेक्षा तुम्ही हे मलाच का नाही विचारलंत? मी तिकडे बसायला तयार आहे.
कॉलेजात आम्हाला आम्ही जर्मन शिकतो म्हणजे फार काहितरी थोर गोष्ट करत आहोत असं वाटायचं. आम्ही जर्मन शिकतो किंवा आम्हाला बोलताही येतं हा माजच त्या प्रसंगामुळे गळून पडला.