मला काही प्रमाणात ललित लेखनाचे मराठीत भाषांतर करण्याचा अनुभव आहे त्यावरून सांगतो. मी अशा लेखनाचे मराठीत भाषांतर करताना दोन टप्प्यांत करतो.
टप्पा १. इतरभाषेतून मराठीत जास्तीत जास्त निर्दोष भाषांतर.
टप्पा २. वर केलेल्या निर्दोष मराठी भाषांतरातून प्रवाही मराठीत पुन्हा भाषांतर. (हा टप्प्यात मूळ इतरभाषिक लेखन शक्यतो दूर ठेवतो.)
तुम्ही केलेले हे भाषांतर काही ठिकाणी पहिल्या टप्प्याचे मला भाषांतर वाटते. त्यावर पुन्हा प्रक्रिया करून ते प्रवाही मराठीत आणावे.
उदा.
तुमचे वाक्य : मला आता जाणवत होते की एखाद्या लहान मुलाच्या निरागस पण बालिश शंकांना उत्तरे देण्यासाठी वेळ देताना ती किती संयत, समजुतदार आणि प्रेमळ असणे गरजेचे होते ते.
माझी सुचवण : एखाद्या लहान मुलाच्या निरागस पण बालिश शंकांना उत्तरे देण्यासाठी वेळ द्यायचा म्हणजे तिला किती संयत, समजूतदार आणि प्रेमळ व्हायला लागत असेल ते मला आता जाणवत होते.
कदाचित्त कुणाला गोष्ट सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा स्वतःशी म्हणून / लिहून याहून अधिक प्रवाहीही करता येईल.