एकूण काय मराठी माणसाला धड मराठीही येत नाही, तो इतर भाषा काय बोलेल? आणि कुणाला आपली भाषा समजते असे कळाले की अचंबा करीत बसेल.
यावरून एक विनोद आठवला.
एकदा एक अमेरिकन पर्यटक बाई युरोपात देशोदेशी भटकत असता, एके दिवशी (नेहमीच्या सवयीने) एका दुकानात शिरली आणि मोठमोठ्याने सर्वांना विचारू लागली, "येथे कोणाला इंग्रजी समजते का?"
उत्तर मिळाले, "बाईसाहेब, आपण इंग्लंडात आहात."