कुणाला आपली भाषा समजते असे कळाले की अचंबा करीत बसेल.
आजकाल यात अचंबा करण्यासारखे काही उरले नसावे. जगात कोठेही (विशेषतः पर्यटक स्थळी) गेले तरी मराठी आवाज ऐकायचा टाळणे जवळपास अशक्य असते. महत्प्रयास करावे लागतात.
(कदाचित पर्यटकांव्यतिरिक्त स्थानिकांनाही आपली भाषा कळते याबाबत अचंब्याचे म्हणत असाल, तर मात्र सहमत. तरीसुद्धा काही दिवसांनी त्याचेही आश्चर्य वाटू नये. 'स्थानिकां'मध्येही मराठीभाषकांची मोठ्या प्रमाणात भरती होते आहे. क्यालिफोर्नियाचा तर कोंकण झाल्याचे ऐकलेले आहेच; इतर ठिकाणेही हळूहळू फारशी मागे राहू नयेत.
थोडक्यात काय, मुंबईत उत्तरप्रदेशी आणि बिहारी येतात, तर मराठी जगभर पसरतात. एकंदरीत विश्वाचा समतोल राखला जातो. हे सर्व चक्रनेमिक्रमेण चालते, आणि चालायचेच. एक जमाना गोऱ्या माणसाने जगभर जाण्याचा होता, आज जगभरातली माणसे गोऱ्या माणसाने आपल्या म्हणवलेल्या मुलुखांत जातात. जागतिकीकरणाचा जमाना तेव्हाही होता, आणि आजही आहे. दिशा बदलली, इतकेच.)