संपूर्ण कवितेतच तुम्ही..
आधीच्या ओळीत अर्धे वाक्य, आणि ओळीच्या शेवटी "-" अशी खूण लिहून, ते पुढच्या ओळीत पूर्ण केले आहेत.. त्यामुळे वाचताना जरा त्रास झाला. (स्पष्ट लिहितोय याबद्दल क्षमा करा ) हे एखाध्या कडव्याच्या बाबतीत फारसे काही वाटत नाही... पण संपूर्ण कवितेत असल्यामुळे थोडं खटकलं (मला).
ही नवीन शैली म्हणूनही स्वीकरता येईल, नक्कीच..!
अशी ओळ माझ्या मनातून जाते
जशी वीजरेखा तमातून जाते-
पुन्हा लुप्त होते, पुन्हा खिन्न होतो
असे वाटते की जरा भिन्न होतो-
तेव्हाच होतो कितीसा बरा मी?
खरा तोच होतो, की आता खरा मी?
शंकाच आहे मनातून माझ्या!
कविता सुचेना! उरातून माझ्या-
ह्या कल्पना आवडल्या.. मनापासून!