गझल म्हणा, हझल म्हणा,
कुठलीच ना जमली म्हणा!
हे सुद्धा चांगले आहे. पण १ल्या ओळीत वृत्त चुकले आहे. ते ठीक करावे. इथे ...
गझला म्हणा, हझला म्हणा ... असे हवे होते.
---- शेरांच्या मधला, अलीकडला/पलीकडला अर्थ कळेल काय?
हो. नक्कीच. अजून साधना करा.
आजानुकर्ण,
काही ओळी वैयक्तिक स्वरुपाची टीका करणाऱ्या वाटल्या. -- एखादी ओळ द्याल का? बरे, तुमच्याबद्दल मला माहितच नाही तर मी कसे काय बुवा लिहिणार?
हझलेमध्ये विनोदी पद्धतीने व्यंग दाखविले जाऊ शकते. जसे व्यंगचित्र असते तसे. त्यात टीका किंवा उपमर्द करण्याचा मानस नसतो. विनोदाला समजून घेण्याची आणि (फुल्या फुल्या फ़ुल्या) टाळण्याची वृत्ती ठेवा. आपल्याला आवडले नाही याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही.
फुल्या फुल्या फुल्या = जे वरील काव्यात आहे ते.
भूषण,
आपल्याला ही हझल आवडली हे वाचून आनंद झाला. म्हणजे यात विनोद आहे तर. तुम्ही काहीही वैयक्तिक घेतले नाहीत हे पाहूनही चांगले वाटले. तुम्ही दिलेल्या ओळीही (नकटी म्हणा) आवडल्या.
सर्वांना हझलिश धन्यवाद!