इतरभाषेतून मराठीत जास्तीत जास्त निर्दोष भाषांतर

रिसिव्हर,  माऊथपीस इ.  शब्दांच्या ऐवजी मराठी शब्द योजता आले असते तर अधिक चांगले वाटले 
असते.  दुसरे म्हणजे "इतरही जगे आहेत" ह्या शब्दाच्या ऐवजी विश्वे,  ठिकाणे असे काही योजता आले असते 
तर अधिक चांगले झाले असते असे मला राहून राहून वाटते.  इतरही जगे आहेत अश्या अर्थाच्या वाक्याचा 
आपण सहसा आपल्या बोलण्यात उपयोग करीत नाही.       

वर केलेल्या निर्दोष मराठी भाषांतरातून प्रवाही मराठीत पुन्हा भाषांतर.

किंवा कथेची मूळ संकल्पना तशीच ठेऊन (अनुवाद न करता) पूर्णपणे ती कथा मराठी पेहेरावात आणणे. मात्र त्यासाठी मराठी 
भाषेवरील मांड पक्की हवी.  असो.  

बघू.  एकदा पुनर्लेखन करूनच बघेन. धन्यवाद.           

कुणाला गोष्ट सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा स्वतःशी म्हणून / लिहून याहून अधिक प्रवाहीही करता येईल.

संगणकाच्या 'स्वर नोंदक' सुविधेचा उपयोग करावा असे माझ्या पण मनात आले होते.