एक मात्र खरे की त्याकाळी टेलेफोनेचे यंत्राला एक प्रकारचा जिवंतपणा होता.

पण त्या सर्व गोष्टी अव्यक्त राहिल्या कारण आपल्याकडे छपाई माध्यमातून "अनुभव लेखन" असे सर्व सामान्य झालेले नव्हते.  भारतीय वाचकही जास्त प्रमाणात असे कार्यानुभव लेख वाचत असतील असे वाटत नाही त्यामुळे परदेशात जसे सफाई कामगार, टपाल वाहक इ.  आपले सेवा-अनुभव लिहितात तसे लिहिण्याचे इथे प्रमाण अगदी अत्यल्प आहे. त्यामुळे काही वाचकांनी असे काही इथे वाचले असण्याची शक्यता कमी आहे. असो.  

अंतरजाल साहित्य निर्मितीमुळे कदाचित् पुढची पिढी मोठ्या प्रमाणात असे लेखन करेल.  

(जाता जाता : शं. ना. नवरे ह्यांचे "शन्ना डे" हे पुस्तक अश्या प्रकारच्या कथा वाचणाऱ्यांना कदाचित् आवडू शकेल. )  

(विषयांतर व/वा व्यक्तिगत रोख वाटलेला भाग वगळला.)