मीसुद्धा बंगलोरमध्येच असते. पण या अनुभवात फजिती मात्र माझी नाही  

एकदा शॉपर्स स्टॉप मध्ये स्त्रियांच्या विभागात असताना तिथेच एक मराठी जोडपे होते. ती स्त्री तिच्या नवऱ्याला वेगवेगळे आधुनिक पद्धतीचे कपडे आणून हे घेऊ का, हे घेऊ का असे विचारत होती. शेवटी तो जरा वैतागून म्हणाला, "अगं,  तुझ्यावर जे चांगलं दिसेल आणि शोभेल ते काहीही घे. " त्यावरून त्यांची तेथेच थोडी शाब्दिक चकमक झाली.

आता मला तिथे असणं उगाच जरा विचित्र(अन्कन्फर्टेबल!) वाटायला लागलं.  तेवढ्यातच माझा भ्रमणध्वनी वाजला आणि मी मराठीत बोलायला सुरुवात केली. माझं बोलणं ऐकून त्या दोघांचाही चेहरा बघण्यासारखा झाला आणि त्यांनी तिकडून पटकन पळ काढला  

असंही बंगलोरला भरपूर मराठी लोक आहेत.  तसेच आधी काही वर्षे पुण्याला/मुंबईला राहिलेले आणि त्यामुळे मराठी समजणारे बरेच अमराठी लोकही आहेत. त्यामुळे जपून बोलावं हे अनुभवातून शिकलेय आता...