पोर्तुगीज चर्चच्या जवळ एका चिनी जोडप्याचा दातांचा दवाखाना आहे.  दोघेही अखंड तिथेच असल्याने 
त्यांचा ८-१० वर्षांचा मुलगा पण शाळा सुटल्यावर तिथेच असायचा.  एकदा जवळच्या एका मराठी 
शाळेची टारगट मुले तिथून जास्त असताना आपले इंग्रजी पाजळायच्या हुक्कीने तिथे जाऊन "हाऊ मच",  
"हाऊ पेनफुल" वै.  बोलायला लागली.  त्यावर त्या चिनीवंशीय मुलाने सणसणीत मराठीत शिवी हासडली 
आणि म्हणाला,  "येत नाही तरी इंग्रजी कशाला फाडताय,  त्यापेक्षा मराठीत बोला की".  त्या मुलांचा 
आवाजच बंद झाला.