मी एकदा माझ्याच मराठी कथेचं इंग्रजी भाषांतर केलं होतं. त्या मानाने तुमची कथा खूपच छान वाटली.
मराठी कथेचे इंग्रजी भाषांतर करणे महा-अवघड कार्य आहे. आपण ते केलेत ह्याबद्दल अभिनंदन. कारण असे करताना फारच शब्द टंचाई जाणवते. आमच्या मराठीच्या प्राध्यापिका म्हणत असत की पदर ढळणेचे इंग्रजी भाषांतर करणे कर्मकठिण कारण संस्कृतिभेद. त्यांच्याकडे ही संकल्पनाच नसावी कदाचित् !