ही चर्चा पाहून आनंद झाला...
मराठी भाषेच्या उद्धाराची धुरा जणूकाही आपल्याच खांद्यावर येऊन पडली आहे, अशा थाटात मनोगतावर मी ही पडीक असते...
चेन्नईत स्थायिक झाल्यानंतर माझी मराठीसाठी काही करण्याची तळमळ अजून वाढली आहे.... याचं पूर्णं श्रेय इथल्या तमिळ भाषिकांना जातं कारण ते कुठल्याही प्रसंगात, अगदी जीव गेला तरी आपल्या मातृभाषेची कास सोडत नाहीत.... आणि आता मी ही असंच चालू केलंय.....
माझ्या घरात मी सोडून सगळे तमिळ भाषिक आहेत (मराठीचा 'म' आणि हिंदी चा 'ह' ही न समजणारे).... त्यांच्याशी सुद्धा मी अधून मधून मराठीतच बोलते.... (नंतर अनुवाद करायला लागला तरीही).... नवऱ्याशी बोलतांना तर हमखास मराठीतंच बोलते...
घरात कालनिर्णय लावलंय... मुद्दाम..!
एकादशी, चतुर्थीचा आवर्जून उल्लेख करते आणि उपासही... मोदक, साबुदाण्याची खिचडी, वडे, पोहे, गोळा तांदूळ, पातळभाजी, कोशिंबिरी हे सगळं करून सगळ्यांना खाऊ घालते..... मराठी संस्कृती आणि पाककलेचा सगळ्यांना परिचय व्हावा म्हणून....
मराठी भाषेकरता जरी मी खुप काही करू शकले नाही तरी.. आपल्या मराठी पाककृती माझ्या आसपासच्या तमिळ लोकांपर्यंत पोचवल्याशिवाय मात्र राहणार नाही... 