एकदा आम्ही बरेच मित्र रेल्वेमार्गाने चान्डील (बिहार) ते कलकत्ता प्रवास करित होतो तेव्हा रात्रिचे जेवण झाल्यावरही पडल्या पडल्या गप्पा चेष्टा मस्करी चालुच होती अश्यातच रात्रिचे १२ वाजले तेव्हा अचानक आवाज आला " ए पोरानो पुरे झाले आता १२ वाजून गेलेत झोपा आता. उरलेल्या गप्पा उद्या करा. " बोलणारा अनोळखी माणुस चक्क मराठी होता आणि काही व्यावसायिक कामानिमित्त प्रवास करित होता.