श्री. प्रभाकर,
माझ्या वाक्यांचा सरसकट अर्थ काढुन, मला मिळत असलेले सल्ले व टोमणे आता काही मला नवीन राहीले नाहीत. असे मी आधी म्हाणालो होतो, हयाला सजेसे असेच आपले वरील लिखाण आहे.
भाग - १ सध्या सापडत नाही. तरी पण आपला वरील प्रतिसाद संदिग्ध आहे. कुठलाही मुद्दा पटल्याची स्पष्टोक्ती नाही.
संदर्भ न वाचताच , चर्चा संपण्याआधीच, आपण मी "मान्य करावे" ही अपेक्षा बाळगून आहात. आणि मी ते "कसे मान्य करावे" हे ही आपणच ठरवता आहत. एखादी गोष्ट मान्यकरण्यात मला कमीपणा / संकोच वाटत नाही, हे आपल्या लक्षात आणून द्यावे म्हाणून स-उदाहरण दिलेल्या लेखात आपण "मान्य आहे" हा शब्द शोधत बसलात, आणि जेथे तो सापडला तिथे.. मी ते का मान्यकेले आहे हे आपणच ठरवून टाकले !! आणि ईतर ठिकाणी मी मान्यकेले नाही असे भासवून मोकळे झालात.
तुम्हाला राजकारण येत नाही म्हणता पण बोलता मात्र राजकारण्यांसारखेच. तुम्ही काय केले? हे विचारल्यावर, इतरांनी काय केले/करावे हे सांगून मोकळे झालात. इतरांकडे बोट दाखवून आपल्या चूका झाकण्याचा प्रयत्न करू नका. - पंकज. शुक्र, ०६/०५/२००५
ह्यावर आपलं उत्तर- यात चुक ते काय आहे? असे आहे.
पटवून ह्यायची इच्छा दिसत नाही. मुद्देसुद, संयमीत विवेचन करणे आणि शब्दाला शब्द वाढवून वाद घालीत बसणे यात फरक असतो.
इतरांकडे बोटे दाखवून, समजविण्याची पद्धतच मला पटत नव्हती, उत्तरे कशीकाय पटतील ?? आपले "इतऱांकडे बोटे दाखवून" केलेलं संयमीत विवेचन सुद्धा पटण्यासारखे नव्हते. शब्दाल-शब्द म्हाणता, वाक्याला वाक्य कोणी वाठवलीत ?
ब्राह्मणांवर, इतर जातींच्या संदर्भात, जेंव्हा जेंव्हा आरोप होतील तेंव्हा तेंव्हा चर्चेच्या रणात इतरजातींनाही उतरावे लागणार. काठावर बसून मजा बघत बसता येणार नाही. मनोगतींव्यतिरीक्त इतर, अजूनही खूप खूप मान्य करतील.
हा आपला भ्रम आहे. पहिली गोष्ट, इतरजातींनाही उतरावे लागणार, नव्हे, तुम्हीच मध्ये ओढणार. दुसरी गोष्ट, आपले हे विचार मनोगतसारख्या (जिथे बरेचण आपले सम-विचारी आहेत) ठिकाणीच मान्य होतील.
चर्चेच्या रणात ... / ब्राम्हणांनी गप्प बसु नये ( इतरांना आवाहन करता) , असली वाक्य मनोगतवर वापरता , आणि ज्या म.टा ने, ब्राम्हणांविरुद्ध लेख छापला, तिथे तोंड बंद ठेवता ! आपल्याला "तिथे" उत्तरे द्या हा सल्ला का नाही पटला, ह्याचे कारण आपल्यालाच माहीत !
आधी, दर्जा खराब ( हे आपणच ठरविले )म्हणून आपण चर्चा सोडलीत, आता, माझ्यावर मी असमजुतदार, काहीही मान्य करायला तयार नाही असे भासवून "वेळेचा अपव्यय" होतोय, असे म्हाणून चर्चा सोडायचे म्हणताय ! व्यक्तिगत आरोप करणे मलाही पटत नाही. परंतु, आपला वरील लेख वाचुन, अजुन काही पर्याय उरला नव्हता.
मयुरेश वैद्य.