Mrudgandha येथे हे वाचायला मिळाले:
माणसाच्या आपल्या आस्तित्वाबद्दलच्या काय काय कल्पना असतात नाही? किती वृथा अभिमान असतो त्याला आपल्या 'असण्याच्या'! अणि हे सगळं मृत्युच्या उघड्या - नागड्या अस्तित्वाच्या पार्श्वभूमीवर! किती हास्यास्पद वाटतो हा अभिमान! अगदी असा आपल्यापुढे उभा असतो मृत्यु - फक्त दिसत नसतो। आपल्या अगदी आजूबाजूला वावरत असतो, पण जाणवत नसतो। आणि कधी आलाच समोर आपल्या कोर्या स्वच्छ स्वरूपात तर केवढं बिचकल्यासारखं होतं। सगळं माहित असूनही कसं अजाणतेपणाच आवरण ओढून घेतो आपण! अगदी 'तो मी नव्हेच' चा आव आणून प्रयत्न करत राहतो ...