मला माझाच ऐकू येइ ना आवाज, राखा शांतता !
जरासा घेउ द्या माझा मला अंदाज, राखा शांतता ॥

हा मतला फार फार आवडला. मला माझाच ऐकू येइ ना आवाज, जरासा घेउ द्या माझा मला अंदाज दोन्ही ओळी फार उत्तम. (माझ्या मते राखा शांतता इथे अगदी चपखल नसले तरी. ) तसे सगळेच शेर चांगले आहेत. रंगांधळाही आणि शेवटचा शेरही विशेष आवडला.

आगामी गझलेसाठी शुभेच्छा. गझला लिहीत राहा.