sanjopraav येथे हे वाचायला मिळाले:
द. मा. मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक. लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक. पण लोकप्रियता आणि दर्जा यांचे काही म्हणजे काही नाते नाही. मिरासदारांचा विनोद टाळ्या खूप घेतो, पण तो ‘टंग इन चीक’ च्या मर्यादा क्वचितच ओलांडतो. बर्याच वेळा मिरासदारांचे लिखाण हे शाळकरी मुलांनी शाळकरी मुलांसाठी केलेले, बाळबोध वाटते. शारिरीक व्यंगे, हाणामारी, आळशीपणा, झोप अशा विषयांवरील मिरासदारांचा विनोद प्राथमिक अवस्थेत अडकून राहिल्यासारखा वाटतो. मिरासदारांच्या कथांमधील व्यक्ती गंमतीदार, तर्हेवाईक आणि विविधरंगी ...
पुढे वाचा. : माझ्या संग्रहातील पुस्तके – मिरासदारी