बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
वादळी वारा, मुसळधार पाऊस सुरु असताना विद्याधर आडोसा शोधात असतो आणि अचानक त्याची विद्याशी गाठ पडते. विद्याला बघून विद्याधर चाट पडतो. या बाईशी आपली अशी घाठ पडेल असे त्याला स्वप्नात पण वाटले नसते. राजकारणात पडून नावाजलेली आणि अनुभवी झालेली विद्या जीव मुठीत धरून लपते आहे हे समजल्यावर त्याला खूपच आश्चर्य वाटते. पैश्याच्या मागे लागलेला विद्याधर प्रोफेसर झाला आहे हे समजल्यावर विद्या पण चमकते. पैश्याचा लोभ आणि राजकारणाचा मोह यामुळे कुटुंबाची कशी दैना ...