पु. ल. -

मला वाटतं हा इंग्लंडमधला प्रसंग आहे. त्या म्हातारीनं 'तुम्ही मराठी आहाट काय? ' असं पु. लं. ना विचारलं होतं आणि त्यांचं बोलणं ऐकून तिला 'गंमट' वाटली होती असं त्यांनी लिहिलंविषय बघून मी हाच प्रसंग लिहिणार होतो; पण प्रतिसादांत तुम्ही लिहिल्याचं बघितलं.

------

माझी एकदा उलटी फजिती झाली होती. मी नुकताच बंगलोरला जाऊन आलो होतो आणि वंदु, येरडु, म्होरू (अनुक्रमे १, २, ३) एवढंच कन्नड येत होतं. परत मुंबईला आल्यावर मित्राबरोबर आमच्या वसतिगृहाबाहेरच्या रोजच्या टपरीवर असणाऱ्या कानडी माणसाकडे चहा प्यायला गेलो.... तो रोजच्याच परिचयातला; पण त्या दिवशी मी येरडु चाय असं कन्नड भाषेत सांगितल्यावर त्यानं चमकून 'वडा चाहिये क्या' असं विचारलं!

- कुमार