SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील उल्लेख, इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रे आणि बखरी या सर्व प्रकारच्या साधनांमधून दादाजी कोंडदेव यांच्या कामगिरीचे एक सुसंगत चित्र आपल्यापुढे उभे रहाते. सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे इतिहासकार श्री. कृष्णराव केळूसकर यांच्यापासून ते सध्याचे नामवंत इतिहासकार प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापर्यंत अनेक विद्वान इतिहासकारांनी दादाजी कोंडदेव यांच्या कार्याचे वर्णनही केले आहे. पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याची नोंद ज्या एकमेव सहा कलमी शकावलीत आहे, त्या नोंदीतदेखील दादाजी यांचा स्पष्ट ...