तुटलेला तारा... येथे हे वाचायला मिळाले:
तुझी आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही, रात्र तर विचारुच नकोस. पावसाळी ऋतु सुरु झालाय पण पाउस पडत नाही. मला जितकी तुझी तितक्याच तिव्रतेने पावसाची आठवण येतेय. मी आसुसलोय तुला पावसात चिंब भिजलेली पहायला, पावसाचे थेंब तुझ्या गालावरून ओघळताना टिपून घ्यायला. वार्याने गारठणारं तुझं शरीर अलगद माझ्या मिठीत शिरून शांत होताना मला पहायचयं. थरथणारे तुझे ओठ माझ्या ओठानी व्यापून टाकायचेत मला ! लाजेने आरक्त झालेले तुझे गाल आणि ...