गझल वाचून भावना अनावर होताहेत. सात-आठ वेळा वाचून काढली.
याला म्हणतात गझल. कुठला शेर आवडला म्हणून सांगू? सगळेच अप्रतिम आहेत.

रंग नभाचे क्षणाक्षणाला बदलत होते
कुणीतरी अस्वस्थ असावे.. समजत होते

मी काही ठरवून व्यथांना बिलगत नाही
जे होते ते माझ्याकडुनी नकळत होते

विचारण्याचा रोख चुकीचा असेल तर मग..
साध्या साध्या शंकांचीही.. हरकत होते
आय हाय... मार डाला.

तुझ्यासारखे हळवे होते मेघ कालचे
गर्जत नव्हते, बरसत नव्हते.. तरळत होते

अजूनही ती सांज हुंदके रोखत होती
दिशादिशांवर अजून काजळ पसरत होते

अलगद पानावरती बसले फूलपाखरू
बहुधा माझ्या वहीत काही उमलत होते....

बास बास.. आता आणखी नको.
भरपूर पुरेल ही नशा.

आपला-
(ऋणी)(चाहता)(बेशुद्ध)
शाहिस्तेखान.

(विषयांतर वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)