थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:

तसं या वेळी मी बर्‍याच गोष्टी पहिल्यांदाच केल्या. जसं,
- पहिल्यांदाच जवळपास ताशी २५० कि.मी. वेगाने प्रवास केला (अर्थात जमिनीवरुन... हवेत केला तर काय विशेष)
- पहिल्यांदाच बर्फाच्छादीत पर्वतावर गेलो
- पहिल्यांदाच समुद्रसपाटीपासुन ३८४२ मी उंच जमीनीवर गेलो


मी बोलतोय आमच्या शमोनिक्स प्रवासाबद्दल. 'शमोनिक्स-मों ब्लाँ' हे त्या जागेचे नाव (शमोनिक्स हे त्या दरीचं/व्हॅलीच नाव). त्यातले मों ब्लाँ (Mont Blanc) हे युरोपातील सर्वात उंच शिखर (उंची ४८१० मी). ते आल्प्स मधे फ्रांस-इटली सीमेवर आहे. माझा फ्रेंच बॉस या जागेचे फार कौतुक ...
पुढे वाचा. : मी पहिल्यांदाच - बर्फात घसरुन पडलो... ('शमोनिक्स'चे प्रवासवर्णन)