प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.
अशा पद्धतीचे लिखाण हे स्वांतसुखाय म्हणून केलेले असते. त्या निमित्ताने होम्सच्या कथा परत वाचणे, त्या समजावून घेणे आणि त्यांचे देशीकरण करणे - होम्सप्रेमींना यापरता आनंद नाही.
कथेचा शेवट मुद्दाम थोडा धूसर ठेवण्याचा प्रयत्न होता. गौतमला हे सगळे कसे कळाले? बापू हा त्याच्याच तालमीत वाढलेला असल्याने त्याला गौतमच्या पुसट उल्लेखांवरुनही सगळे ध्यानात आले, पण वाचकांचे काय? तर (ज्यांनी ही मूळ कथा पूर्वी वाचलेली नाही, त्यांनी ) वाचकांनी त्यावर थोडा विचार करावा, असा हेतू होता. ते जरा फसल्यासारखे वाटल्यास त्या माझ्या मर्यादा.
इ-मेल वगैरे अर्थातच होम्सच्या मूळ कथेत नाही. टाईपरायटर आणि त्यातली मोडकी, झिजलेली अक्षरे असा मूळ उल्लेख आहे. हे सगळे आता कालबाह्य झाले असल्याने मी इ-मेल, फ्रेंच शब्दांचा वापर, आय पी ऍड्रेस असे स्वातंत्र्य घेतले आहे. (सर डॉईल कबरीत तळमळत नसतील अशी आशा आहे! )
शेवटी कथेतल्या इतर भाषांच्या उल्लेखांविषयी. यासाठीचे सगळे संदर्भ मी उसने आणले आहेत. भाषांची आवड - फारफारतर इतकेच श्रेय मी घेतो. 
संजोप राव