माझ्या मते इतिहासाचा अभ्यास हा चुकांची पुनरावृत्ती होऊ नये या साठीच असतो. माझ्या मते भारत भुमी ला लागलेला सर्वात मोठा रोग म्हणजे समाज विभाजन. आपल्याला आपले स्वतःचे सिंहावलोकनं करावे लागेल. छत्रपतींच्या इतिहासातून आपणं काय शिकलो? जातिधर्मावरून एकमेकांची अवहेलना करणे? की सर्वधर्मसमभाव? जे झाले आहे त्यांविषयी चर्चा करून ते थोडीच बदलणार आहे. आणि माझ्या मते कोनीच इतिहास हा बदलू शकणार नाही. कारण गेलेली वेल हि कधीच परत येत नाही.इथे सर्वात महत्त्वाचे आहे ते प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तिंचे गुण अंगी बालगन्यची, मग ते कोनी हि असो. अकबर, औरंगजेब, शिवाजी, संभाजी .
कोनी राजकीय पक्ष अथवा संघटना एखादी कोणतीही मागणी करो त्याला अर्थ नाही करणं ते झालेला इतिहास बदलवू शकत नाही. राजकारणी लोकावर आरोप करून काहीच फायदा नाही त्यांचा गुणधर्मच आहे रंग बदलण्याचा, इथे आपण स्वतः विचार करायला हवा. जर कोनी म्हणाले की चला आपण विहिरीत उडी मारू तर आपण खरंच उडी मारणार का? इथे मला फक्त इतकेच सांगायचे आहे की, आपण किती दिवस असेच राहणार आहोत? नुसती जयंती साजरी करणार की आपल्या अंगी जमेल तितके गुण सामावून घेणार.
इथे जर आपला समाज सुधारावा अशी अपेक्षा जर आपण बालगत असलो तर ति चुकीची नाही परंतू आपण स्वताः त्या समाजाचाच एक घटक आहोत हे हि विसरून चालणार नाही. जो पर्यंत आपण स्वतः बदलत नाही तो पर्यंत समाजही बदलणार नाही. सदर लेखाला बराच आणि विशेष म्हणजे तज्ज्ञांच्या प्रतिसाद मिलला आहे. माझे ज्ञान हे त्यांच्या समोर कमी आहे. परंतू मी माझे विचार अगदि रोखथोक मांडले आहेत. कृपया तज्ज्ञांनी मदत करावी. आणि कोणताही रागलोभ नसावा हि विनंती