गोळे काका, शब्दबंधसाठी स्वतंत्र भाग लिहिल्याबद्दल धन्यवाद. डिमडिमवर १००० नव्हे, १०० सदस्यांना सहभागी करण्याची सोय आहे. चुकून १००० असं पूर्वी ब्लॉगवर प्रकाशित झालं होतं. ते निदर्शनात आल्या आल्या ताबडतोब बदललं. कृपया तुमच्या या लेखातही तो बदल करावा ही विनंती.
अ सेन मन, मेघना भुस्कुटे, ट्युलिप व संवेद यांनी "रेषेवरची अक्षरे" हे मराठी ब्लॉगांवरील निवडक दर्जेदार साहित्याचं संकलन दुवा क्र. १ येथे उपलब्ध आहे. महाजालावरील मराठी साहित्याच्या इतिहासात त्याचीही नोंद व्हायला हवी.
तसंच, नंदनने पूर्वी "जे जे उत्तम" हा प्रकल्प राबवला होता. आपण सध्या वाचत असलेल्या पुस्तकातला आपल्याला सर्वात जास्त आवडलेला पानभर मजकूर लेखक, प्रकाशक, इत्यादी पुस्तकपरिचय देऊन आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करण्याचा तो उपक्रम होता. याचीही कृपया नोंद घ्यावी.
असो. बाकी लेख छान आहे.
अधिक काय लिहिणे?