ज्या समासातला दुसरा शब्द 'अंत' असतो तो शब्द लिहिताना अनुस्वार न वापरता पर-सवर्ण(म्हणजे इथे 'न') जोडून लिहावा.
उदाहरणार्थः--वेदांत=अनेक वेदांमध्ये. परंतु वेदान्त=वेदांच्या अंती येणारे तत्त्वज्ञान.
देहांत=अनेक देहांमध्ये. परंतु देहान्त=देह संपेपर्यंत.
सिद्धांत=अनेक सिद्ध पुरुषांत. परंतु सिद्धान्त= प्रस्थापित सत्य.
वीकांत=अनेक वीकांमध्ये. वीकान्त=वीकाच्या शेवटी. वगैरे वगैरे.
आकांत या शब्दात 'अंत' नसल्याने पर-सवर्ण वापरण्याची गरज नाही.
असेच आणखी शब्द:--अंन(X), अंणा(X), निंमा(X), असे न लिहिता अन्न, अण्णा, निम्मा असे लिहावेत.