Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या दोन वर्षात चार वेळा एकटीने विमानप्रवास केला. मुळात प्रवासाला जायचेय ह्या नुसत्या विचारानेच मी रस्त्याला लागते. त्यात बरोबर कोणीही नाही म्हणजे पर्वणीच. त्यातून विमानप्रवास म्हणजे घरातून निघून घरात पोचेतो चोवीस पासून तीस तासांपर्यंतचा मुबलक वेळ पूर्णतः माझ्या मालकीचा ... खरे तर मनाच्या ताब्यात. मी त्याला मुक्त सोडून देते.... जिथे ते नेईल तिथे मी पिसासारखी हलकी होत होत घरंगळत राहते. अंतरंगात कुठेतरी खोलवर गाडलेल्या काही नोंदी, एकेकाळी जीवाभावाची असलेली माझी माणसे. आता हाकेच्या अंतरापलीकडे गेलेले बालपण. कॉलेजमधली धमाल... आणि बरेच काही. ...