काल शुद्धलेखनाच्या चुकांमुळे लेख अगदी नको वाचायला वाटत होता. आता मात्र ठीक वाटत आहे.

ह्या विषयावर नेटवर हल्ली पुष्क्ळ वाचायला मिळते (पुलंच्या असामी असामीतल्या उत्तरार्धावर किंवा बटाट्याची चाळ एक चिंतन च्या स्टाईलवर) त्यामुळे कंटेंट मध्ये नावीन्य नसले तरी तुमची लिहायची चिकाटी आणि आत्मीयता दाद देण्यासारखी आहे.

सरावाने नक्की आणखी चांगले लिहू शकाल, असा विश्वास वाटतो. (तुम्ही चांगले लिहू शकाल असे वाटूनच शुद्धलेखनाकडे बारकाईने लक्ष द्या असे मनापासून सांगावेसे वाटते. )

पुढील लेखनास शुभेच्छा.