दुसरीकडचे उतारे देण्याची कल्पना चांगली आहे. फक्त देताना ही काळजी घ्या.-

  1. मूळ लेखाचा संदर्भ देताना त्याचा संकेतदुवा (लिंक) सुद्धा द्यावा.
  2. मूळ लेखातला काही भाग गाळला असेल तर ते '...' असे दर्शवावे.
  3. मूळ लेख किंवा त्यातला मजकूर जसाच्या तसा प्रत चिकटवू (कॉपी पेस्ट)नये. त्यातली अक्षरे वेगळी असतात. मनोगत हे देवनागरी युनिकोड वापरून बनवलेले आहे, त्यात इतर ठिकाणची अक्षरे उमटणार नाहीत. ते मजकूर पुन्हा येथे लिहावे लागतील.

मी असे सर्व बदल वर केले आहेत.