माझी माय सरस्वती येथे हे वाचायला मिळाले:

तुझ्या कथा, तुझ्या कविता.
तू लिहितोस त्यातला शब्द-न्‌-शब्द, वाक्य-न्‌-वाक्य मला तुला अभिप्रेत असलेल्या अर्थासहच जाणवावं असा हट्टाग्रह का तुझा?
का समजावून देऊ पाहतोस प्रत्येक ओळ मला?
तुझं लिखाण वाचताना माझ्यापासचं अनुभूतींचं गठुळं मी का सारायचं बाजूला?
तू लिहिताना त्यात तुझं तुझेपण ओतलंस, मी वाचताना माझं मीपण ओतते.
त्या वाचनाचा पहिला अनुभव तरी माझा मला एकटीला घेऊ देत. उगाच प्रस्तावना देत बसू नकोस.
मला वाटलं तर घेईन तुला विचारून, का-कधी-कुठे सुचलं हे तुला.
काही काही शब्द मला ’कळणार’ नाहीत. अवघड वाटतील.
वाटू देत.
तू ...
पुढे वाचा. : रंगुनी रंगांत सार्‍या...