चर्चा माझ्यासारख्याला अंतर्मुख अंतर्मुख करत आहे. कधीतरी कांही विचार कुठून तरी मनात येतात. ते जमेल तसे कागदावर उतरवले जातात. त्याला ढोबळ मानाने कविता म्हणायचे एव्हढेच. या चर्चेच्या निमित्ताने शब्दकोश पाहिला. त्यात 'कव' (यातील 'व' चा पायतोडलेला) या धातूचा अर्थ स्तुती करणे, वर्णन करणे, चितारणे असा दिलेला आहे. दुसरे म्हणजे 'वृत्तदर्पण' मध्ये प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे 'अलिकडे आधुनिक कवींनी पुष्कळच नवीन छंदप्रकार उपयोगात आणले आहेत. कवितेच्या शरीर-वर्धनाबरोवर तिची वस्त्रेही पुष्कळ व निरनिराळ्या प्रकारची होणे जरूर आहे.' याच छोट्याशा संदर्भ ग्रंथात शंभर वृत्त-जाती

देताना मुक्तछंद  हा दीर्घोच्चारी अक्षरछंद असून तीन तीन अक्षरांचे दोन गट किंवा एक तीन अक्षरी व पुढचा दोन अक्षरी गट मिळून षडक्षरी-पंचाक्षरी जोडगट पुन्हा पुन्हा येत राहतात तसेच चरणात येणाऱ्या अक्षरगटांची संख्या कमीजास्त असू शकते असे

म्हटलेले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, मुक्तछंदाचे आणखी अनेक प्रकार आहेत.  त्याचप्रमाणे, मुक्तशैली हा वेगळा प्रकारही

वर्णिला आहे. त्यात काही अक्षरांवर आघात किंवा भार देऊन वाचन होते व त्यामुळे आंदोलित गती निर्माण होते, असे म्हटलेले आहे. ही शैली मुक्त गद्य-काव्याला जवळची रचनाशैली असल्याचे सांगितले आहे.

गझल हा तर मराठी काव्यासाठी पाहुणा प्रकार आहे.

शब्दकोशाच्या आधारे असे दिसते की रसात्मक शब्दरचना ही काव्याची खूण तर ठराविक चरणसंख्या ठेवून रचलेली कविता हे पद्य होय. अशा रचनांची गेयता हा (अतिरिक्त) गुण असल्याचे म्हणता येईल.