हे लोक मराठी चा द्वेष का करतात? थोडं खोलात जाऊन ह्याची कारणं समजली तर जास्त बरं होईल.
दुसरी गोष्ट, ह्य बीएमएम बद्दल मला फारशी काही माहिती नाही. इथून पुढे सगळ्यांनाच मराठी मधून ह्या ह्याचा अभ्यास करावा लागणार का? का इंग्लिश किंवा मराठी असे पर्याय असतील? तसा पर्याय असेल तर मग हे लोक विरोध का करत आहेत? फक्त मराठी द्वेष्टेपणाचे कारण हे मला तरी पटण्यासारखे नाही. मला वाटते आपण दोन्ही बाजू नीट मांडत नाही आहात.
या प्रत्येकाचं स्वत:चं दु:ख आहे. प्रा. बालापोरिया यांच्या मते त्यांनी हा अभ्यासक्रम सुरुवातीला तयार केलाय, त्यामुळे पुनर्रचनेत त्यांचं अमूल्य (! ) मत हवंच होतं - बरोबरच आहे. सामान्यतः अशी अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही. मी जर एखाद्या गोष्टीचा पायोनिअर आहे तर त्यात नवीन भर वगैरे टाकताना माझी मतं विचारात घेतली गेलीच पाहिजेत...
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे हा विषय रस्त्यांवर आंदोलन करून सुटण्यासारखा नाही. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की, मराठी आणि अमराठी लोकांनी एकमेकांविरुद्ध मुसंड्या मारुनही काही होणार नाही. बी पोलिटिकली स्मार्ट, बी डिप्लोमॅटिक ऍण्ड बी स्मूथ ऍण्ड सटल...