१.शहरात की चांगल्या कृत्यात तेच कळेना. (पुण्यात)
विशेष प्रकारच्यास उलटवून जिवाभावाचा करा. (सखा)
१२सुराभोवती रिंगण म्हणजे अंगाभोवतीची वस्त्रे (कपडे)
२२प्रशंसेपाठोपाठ घृणा दर्शवणारे एक उपनगर. (वाशी)
२४फक्कड डफासकट इथं नाचतात. (फड)
३१कोडकौतुक व्हावे असे हे गृहस्थ. (लाड)
३३बांग्लादेशाच्या नाण्याला खोटा पाडू नका. (लटका)
४१व्रत घेऊन राहा. (वसा)
४३त्याने खिळ्यांनी प्रमाद करावा. (चुकावा)

उत्तर द्यायची तीच तीच पद्धत वापरून कंटाळा आला म्हणून उत्तर असे पाठवले आहे.

.................कृष्णकुमार द. जोशी

पूर्णचंद्राच्या रात्री नवाच्या आधी पुकार. (पुनव)
चारित्र्याअगोदर बारा वर्षं लावली की विस्ताराने माहिती मिळते. (तपशील)
एकटे कुजून जाई. (सडे)
१२या दरवाजाच्या दोन्ही कडांना कडच आहे. (कवाड)
१५पाणी शिंपडून शेवटी लबाडीच करायची. (शिडकावा)
२४तोट्याचा जोरदार तडाखा  (फटका)
३१चिकटव आणि लागवड कर. (लाव)