मिळालेली माहिती अशी : अक्षरगणवृत्तांचे जे प्रकार आहेत, त्यातील अनुष्टुभ हे एक समवृत्त. याची पादाक्षरे ८ आणि याला गणांचा नियम नाही. याचे लक्षण असे सांगितले आहे :- अनुष्टुप छंद तें ज्याला ॥ एक नेम नसे गणीं ॥ अक्षरें चरणीं आठ ॥ देवा तार मला त्वरें ॥ (--   -~   ~- ~- ॥) - संदर्भ :  कै. परशुरामतात्या गोडबोले यांचे वृत्तदर्पण (१९६५ ची शतसंवत्सरी आवृत्ती.

(कविता मात्र अजून पूर्ण वाचली नाही, क्षमस्व.)